राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजना आपल्या दारी उपक्रम

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजना आपल्या दारी उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर जिल्हाच्या वतीने "विविध शासकीय योजना आपल्या दारी" हा कार्यक्रम 14 जून पासून 14 जुलै पर्यंत राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (मोफत पास), प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, रेशन कार्ड संदर्भातील सर्व कामे अशा ऐकून 18 शासकीय योजना राबवण्यात येत आहेत.  या योजनेसाठी  आधार कार्ड, पॅन कार्ड , जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, सातबारा, 8 अ , दारिद्र्य रेषेखालील दाखला, संमती पत्र, गावठाण उतारा, चार फोटो आणि विधवा असलेच दाखला, ही कागदपत्र घेऊन शहीद जवान अभिजीत सूर्यवंशी पथ, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, शिवाजी पेठ येथील कार्यालयास भेट द्यावे असे आवाहन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले आहे.