शाहू गव्हर्मेंट बँकेमध्ये भास्करराव जाधव यांची जयंती साजरी
कोल्हापूर प्रतिनिधि : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कै. नामदार भास्करराव जाधव यांची " 157 वी " जयंती उत्साहात पार पडली. कै. नामदार भास्करराव जाधव यांच्या पुतळ्यास बँकेचे अध्यक्ष श्री. अतुल ग. जाधव व संचालकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. कै. नामदार भास्करराव जाधव यांचा आदर्श व दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कामकाज करीत आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत बैंक शतकोत्तर वाटचाल करीत असून 108 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. कै. नामदार भास्करराव जाधव यांचे आर्थिक साक्षरतेच्या विचारांचा ठेवा जतन करुन, बदलत्या आधुनिक बैंकिंग कामकाजाचा अवलंब करीत बँकेचे प्रगतीसाठी यापुढेही काम करीत रहाणार असलेचे यावेळी नमूद केले.
यावेळी अध्यक्ष अतुल ग. जाधव, उपाध्यक्ष अजित शं. पाटील, संचालक सर्वश्री रविंद्र व. पंदारे, शशिकांत दि. तिवले, मधुकर श्री. पाटील (एम्.एस्), रोहित प्र. बांदिवडेकर, विलासराव शं. कुरणे, रमेश ग. घाटगे, सदानंद व. घाटगे, संचालिका हेमा सु. पाटील, मनुजा शै. रेणके, संचालक संजय स. खोत, किशोर रा. पोवार, अरविंद भि. आयरे, प्रकाश भि. पाटील, तज्ञ संचालक दिपक श्री. पाटील, गणपत बा. भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरेश रा. शिंदे, मुख्य लेखापाल श्री. रुपेश कृ. पाटोळे त्याचबरोबर सभासद तसेच कर्मचारी उपस्थित होते.