HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजकीय हेवेदावे व मतभेद विसरून मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठींबा

राजकीय हेवेदावे व मतभेद विसरून मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठींबा

आजरा (प्रतिनिधी) : राजकीय हेवेदावे व मतभेद विसरून मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठींबा असल्याचे स्पष्टीकरण भादवण ता. आजरा येथील सरपंच संजय पाटील यांनी केले. 

भादवणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर मेळाव्यात हा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्यावतीने उपसरपंच संजय पाटील यांनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी अशोकअण्णा चराटी होते.

          

 पाटील भाषणात पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयासह मातोश्री पानंद रस्ते अंतर्गत सेवा सुविधा व इतर विकासकामे पूर्ण करू.       

         

साजिद मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध असणारे लोकसेवक आहेत. या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून जनसेवेची संधी द्या.      

           

गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, भादवनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्यावतीने सरपंच संजय पाटील यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. समरजित घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. घरातील महिलांना त्रास देऊन आमदार होण्याच्या या राक्षसी महत्वाकांक्षी प्रवृत्तीला रोखलेच पाहिजे.     

           

यावेळी माजी सैनिक संघटनेचे आनंदा देवरकर, अर्जुन कुंभार, बाळकृष्ण सुतार, प्रमोद घाटगे, संगीता देसाई, तानुबाई देवरकर, दशरथ डोंगरे, पी. के. केसरकर, संभाजी कांबळे, अशोक गुरव, दत्तात्रय पाटील, सदाशिव डोंगरे, शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत देवरकर, नामदेव डोंगरे, जयसिंग गाडे, संतोष डोंगरे महेश कोलते, श्रावण पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

             

स्वागत शाखाप्रमुख श्रीकांत देवरकर यांनी केले. प्रास्ताविक पी. के. केसरकर यांनी केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.