राधानगरी तहसील कार्यालय स्थलांतर विरोधात भाजपचे निवेदन

राधानगरी तहसील कार्यालय स्थलांतर विरोधात भाजपचे निवेदन

राधानगरी (प्रतिनिधी): येथील तहसील कार्यालयच्या नवीन इमारतीचे बांधकामस सुरुवात होणार असून आता हे कार्यालय राधानगरी पासून दोन किमी अंतरावर स्थलांलतरित होणार आहे. त्यामुळे येथे कामासाठी येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. हे कार्यालय येथील अन्य सरकारी कार्यालयात शिप्ट करावे.अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा राधानगरी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. 

  याबाबताचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे व तालुकाध्यक्ष विलास रणदिवे यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांना दिले.यावेळी जिल्हा चिटणीस डॉ. सुभाष जाधव,जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील, बी. एस. पाटील, लहू जरग, मानसिंग पाटील, महेश पाटील यांच्यासह तालुक्यातील पकदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.