इचलकरंजीतील युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
इचलकरंजी प्रतिनिधी : इचलकरंजीतील शहापूर परिसरात एका युवकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शहापूर चावडीजवळ घडली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही युवकांनी नशेमध्ये ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस तपासात अधिक माहिती पुढे येईल अशी अपेक्षा आहे.