राधानगरी तालुक्यातील बालकाचा तननाशक सेवन केल्याने मृत्यू

राधानगरी तालुक्यातील बालकाचा तननाशक सेवन केल्याने मृत्यू

राधानगरी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालूक्यातील आमजाई व्हरवङे येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या वेदांत अशोक पाटील वय ( 10) याने खेळताना अनावधानाने थंड पेय समजून तणनाशक प्यायल्याने मूत्यू झाला.

वेदांतने तीन दिवसांपूर्वी (बुधवारी) सकाळी मित्रांच्या बरोबर खेळताना घरातील ठेवलेले तननाशक थंड पेय समजून अनावधानाने सेवन केले होते. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील सी. पी. आर.रुग्णालयात दाखल केले होते.पण उपचार सूरू असतानां आज पहाटे 6 वाजण्याच्या सूमारास त्याचा मूत्यू झाला. वेदांत इयत्ता पाचवी मध्ये शिकत होता. त्याच्या अकाली निधनाने आमजाई व्हरवडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.