काँग्रेस तर्फे शनिवारी तिरंगा यात्रेचे आयोजन

काँग्रेस तर्फे शनिवारी तिरंगा यात्रेचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या जवाबी हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी शनिवारी २४ मे रोजी, सकाळी 10 वाजता, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथून तिरंगा यात्रेला सुरुवात होणार आहे. 

ही तिरंगा यात्रा खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील महाराष्ट्र विधान परिषद गटनेते तथा अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बी.एम. संदीप यांच्या नेतृत्वाखाली व आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन प्रल्हाद चव्हाण अध्यक्ष कोल्हापूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, राहुल पी.एन. पाटील माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषद, गणपतराव पाटील चेअरमन-दत्त साखर कारखाना शिरोळ, राजू लाटकर माजी स्थायी समिती सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस तर्फे शाहू समाधी स्थळ येथून तिरंगा यात्रेला सुरुवात करून सीपीआर हॉस्पिटल चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (महानगरपालिका चौक) - छत्रपती शिवाजी महाराज चौक - भवानी मंडप मार्गे बिंदू चौक येथे तिरंगा यात्रेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येईल.

या तिरंगा यात्रेस आजी माजी खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापालिका तसेच नगरपरिषद नगरसेवक - नगरसेविका, तालुका अध्यक्ष, शहर ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, इंटक संघटना, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, माजी सैनिक संघटना, अपंग संघटना, निराधार निराश्रित सेल, VJNT सेल, असंघटित कामगार सेल, परिवहन सेल, अल्पसंख्यांक सेल, वक्ता सेल, किसान व मजदूर सेल, पर्यावरण सेल, रोजगार स्वयंरोजगार सेल, माथाडी कामगार सेल, सांस्कृतिक सेल, शिक्षक सेल, विज्ञान व तंत्रज्ञान सेल काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेेळेवर उपस्थित राहावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.