राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ कोल्हापुरातून रवाना
कोल्हापूर - ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) आयोजित ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप बेळगाव (कर्नाटक) येथे दि. २७ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघ नुकताच कोल्हापुरातून रवाना झाला.
यात कोल्हापूरच्या पाच मुलींचा सहभाग असून चार मुली काडसिद्धेश्वर हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या तर एक मुलगी संजीवन विद्यानिकेतनची आहे. आसावरी पाटील (गोलकीपर), समिक्षा मेंगाणे जान्हवी ढेरे (डिफेंडर), अदिती ढेरे व पूर्वा भोसले (फॉरवर्ड) या कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तेजस्विनी थापा (कर्णधार), सिद्धी दोभाडे (उपकर्णधार), आसावरी पाटील व समायरा शर्मा (गोलकीपर), नवमी शानबाग, साधिका शाम, समिक्षा मेंगाणे, न्यासा बोंद्रे, जान्हवी ढेरे, दिया पयापिल्ले, अलिशा मेहता, कादंबरी पाटील, गौरी गुरव, तनिषा अह्मेरा, प्रिशा विराल, हरलिन सोखी, सनया इराणी, अदिती ढेरे, श्रुती कुंभार, पूनम रोकडे, पूर्वा भोसले, श्रीया मोरे. संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पृथ्वी गायकवाड, सहा. प्रशिक्षक श्रुती लक्ष्मी व्हीकेव आणि फिजिओथेरपिस्ट श्रद्धा शेलार काम पाहणार आहेत.