विना अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणाचा अहवाल १० मेपर्यंत द्या - ना. चंद्रकांत पाटील

विना अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणाचा अहवाल १० मेपर्यंत द्या - ना. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयांमध्ये तत्कालीन सहसंचालकांच्या मंजुरीने विनाअनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुदानितवर बदली करण्यात आली. त्या सर्व ८० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या भरती गो प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करा. त्याचा अहवाल येत्या १० मेपर्यंत द्या, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांना दिले.

मंत्री पाटील यांनी विभागीय सहसंचालक कार्यालयाला भेट देऊन शैक्षणिक कामाचा आढावा घेतला. सहसंचालक कार्यालयातील ई ऑफिस, झीरो पेंडन्सी याची माहिती घेतली.