वाटेगावात जय धर्मनाथ गणेश मंडळाने जपली सामाजीक बांधीलकी
वाटेगाव (प्रतिनिधी) : तालुका वाळवा येथील जय धर्मनाथ गणेश मंडळाच्या वतीने गावातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा सत्कार करण्यात आला . यामध्ये ग्रामदैवत वाटेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य पोलीस पाटील.संतोष करांडे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीकृष्ण नलावडे , तंटामुक्ती उपाध्यक्ष तानाजी चव्हाण , शेखर धुमाळ आदीचा सन्मान करण्यात आला .
तसेच गावात लोकोपयोगी श्रमदान करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष संजय रोटे , सचिव अशोक मोरे इतर सैनिकांचा सत्कार करण्यात आला . तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या वतिने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच नंदाताई चौगुले यांचा सत्कार करणेत आला . या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी अभिजित मुळीक, युवराज मुळीक, जगनाथ मुळीक , आदी सदस्य उपस्थित होते .
सुत्रसंचलन सुरेश मुळीक यांनी केले .