HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.16 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील-  शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे, दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सिध्दनेर्ली व बाचणी, वारणा नदीवरील - चिंचोली,  हिरण्यकेशी नदीवरील-  ऐनापूर व साळगाव, कासारी नदीवरील - यवलूज असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत.

 जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.16 टीएमसी,  तुळशी 3.47 टीएमसी,  वारणा 34.02 टीएमसी, दूधगंगा  23.50 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.68 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी,  जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला - 0.48 व  कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

आज सकाळी 7 च्या अहवालानुसार बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.9 फूट, सुर्वे 19.6 फूट, रुई 49 फूट, इचलकरंजी 46.6 फूट, तेरवाड 44.6 फूट, शिरोळ 34.6 फूट, नृसिंहवाडी 33 फूट, राजापूर 22.10 फूट तर नजीकच्या सांगली  10.6 फूट व अंकली 13.7 फूट अशी आहे.

 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.