HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे बिनविरोध

विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे बिनविरोध

नागपूर : नागपूरमध्ये सध्या अधिवेशन सुरू असून विधानपरिषदेला सुरूवात झालीये. विधानपरिषद सभापतीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड व्हावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी बहुमताने राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाली. राम शिंदे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

राम शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात आल्याचे नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. यानंतर राम शिंदे यांच्याबद्दल परिचय देताना निलिमा गोऱ्हे या दिसल्या. राम शिंदे यांची विधान परिषदेत आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली आहे. यानंतर नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली.

रोहित पाटील यांच्याकडून पराभव

राम शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक कर्जत जामखेडमधून लढवली होती. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. राम शिंदे यांना बाराशे मत कमी मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. राम शिंदे यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली होती. आता राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आलीये. 

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणीची नेमकी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा रंगत होती. यानंतर आज भाजपाने राम शिंदे यांच्या नावाची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड केली. राम शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीकडे तेवढे संख्याबळ नसल्याने त्यांनी उमेदवार जाहीर केला नव्हता. विधानपरिषदेकडे फक्त राम शिंदे यांचा एकच अर्ज आला होता.

राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसवून पदभार सोपविला. तब्बल वीस वर्षानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधानपरिषद सभापतीपद मिळाले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.