HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल पोलिसांचा सत्कार

विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल पोलिसांचा सत्कार

कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीत  चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांचा सत्कार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. चांगल्या कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन हा सत्कार करण्यात आलाय. तसेच  प्रलंबित गुन्हे उघडकीस आणुन फरारी आरोपींचा शोध घ्यावा. तसेच फिर्यांदींना कागदपत्रे तत्काळ द्यावीत, अशा सुचनाही  मंगळवारी झालेल्या क्राईम आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी केल्या.  

बैठकीच्या सुरुवातीस २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईत झालेल्या हल्लयातील शहिद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने शपथ घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले,आता पुन्हा कामाला लागा. एक वर्षापेक्षा अधिक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात सादर करावे. प्रलंबित तक्रार अर्ज निकाली काढावे, रखडलेल्या गुन्ह्याचा तपास तातडीने करावा. आरोपींचा शोध घेऊन मालमत्ता हस्तगत करावी. अपघातांच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घ्यावा. तसेच अपघाताच्या प्रकरणातील कागदपत्रे संबंधीत तक्रारदारांना तातडीने द्यावीत. तक्रारदारांना पोलीस ठाण्यात जास्त वेळ ताटकळत बसवू नये. जे पोलीस अधिकारी कामात कसूर करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशा सुचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह सर्व विभागाचे पोलीस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक,प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.