शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांना मातृशोक

जयसिंगपूर, : जयसिंगपूर येथील श्रीमती कमल आप्पासाहेब बागणे (वय ८२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर व दक्षिण भारत जैन सभेचे कोल्हापूर विभागाचे ट्रस्टी अनिल बागणे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार (ता. २१) रोजी सकाळी ८.०० वाजता जयसिंगपूर (उदगाव) येथे आहे.