‘शरद पॅटर्न’चा फायदा जीवनात यशस्वी होण्यासाठी- अनिल बागणे
यड्राव (प्रतिनिधी) : ''विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून हि संस्था वाटचाल करीत आहे म्हणूनच अत्यल्प काळात यशस्वी झाली आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, औद्योगिक पूरक कौशल्ये शिकविण्याबरोबरच महाविद्यालय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग व एक वर्षाचा इंटर्नशीपचा समावेश करीत आहे. या अद्यावत कौशल्याचे उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे." असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते.
यावेळी बोलताना बागणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निग, अॅक्टीव्हिटी प्रोग्रॅम, प्रोडक्शन सेंटर, इंटर्नशीप याच्यासोबत २८ प्रकारचे अद्यावत कौशल्ये उपलब्ध आहेत. ज्याचा उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे.
ते म्हणाले, ''विद्यार्थ्यांना स्वत:च्या अस्तीत्वाची जाणीव करुन देणारा पॅटर्न म्हणजे शरद पॅटर्न आहे. या पॅटर्नमध्ये शिक्षण, उद्योग व संस्काराची मंदिरे उभी आहेत. प्रत्येकाने आपल्या आई, वडील व शिक्षकांचा आदर राखला पाहीजे.''
दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. तसेच पुढील चार वर्षे विद्यार्थ्यांने काय करायचे याचा कानमंत्र दिला. सर्व विभाग प्रमुख यांनी महाविद्यालय व विभागाची माहीती दिली. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते.
स्वागत प्रथमवर्ष विभाग प्रमुख डॉ. सारीका पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कल्याणी जोशी यांनी केले. आभार प्रा. स्मिता कोरे यानी मानले.