डॉ. संजय डी. पाटील यांचे बांधकाम क्षेत्रातील योगदान अतुलनीय-जिल्हाधिकारी अमोल येडगे

डॉ. संजय डी. पाटील यांचे बांधकाम क्षेत्रातील योगदान अतुलनीय-जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती त्यांनी आपल्या कामातून दिली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कोल्हापूरच नव्हे तर देशभरातील इंजिनिअर्ससाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.

असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजनिअर्स कोल्हापूरच्यावतीने हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात आयोजित ‘इंजिनिअर्स डे’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डॉ. संजय डी. पाटील यांना असोसिएशनचं मानद सदस्यत्व प्रदान करून सन्मानित करण्यात आले. असोसिएशनच्या 53 वर्षांच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे डॉ. पाटील हे तिसरे सन्मानमूर्ती ठरले आहेत. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.

येडगे म्हणाले, डॉ. संजय डी. पाटील यांनी केलेल्या कामाचे कॅल्क्युलेशन केले असता त्यांनी आजपर्यंत एक हजार एकर एरिया कव्हर करेल एवढे प्रचंड बांधकाम केले आहे. त्याशिवाय आणखी पाचशे एकर एरिया व्यापेल असे काम सुरू आहे. हे सर्व काम बघता त्यांनी किती तास काम केले असेल? या सर्वातून किती मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला याचा विचार केला तर हे सर्व काम अतुलनीय असेच आहे.

कोल्हापुरातील पर्यटन विकास असो कि पूरस्थिती किंवा नागरिकांचे कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे नेहमीच मोठे योगदान असते. कोल्हापूरच्या विकासात संघटनेचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठीच्या कोणत्याही प्रकल्पात तांत्रिक सहाय्य व अन्य मदतीसाठी असोसिएशन नेहमीच अग्रभागी राहिले आहे. यापुढेही असोसिएशनचे असेच सहकार्य राहील याची खात्री असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. 

डॉ. संजय पाटील म्हणाले की, शिक्षण क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्राची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड असल्याने आर्किटेक्ट  आणि इंजिनिअर्स यांच्याशी नेहमीच अटॅचमेंट आहे.  या संघटनेचा भाग होण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.  गेल्या 40 वर्षात अडीच हजाराहून अधिक सिव्हील इंजिनिअर्स आणि २ हजाराहून अधिक आर्किटेक्ट आमच्या संस्थेतून पास आउट झाले आहेत.  आर्किटेक्चर विभागाचा निकाल नेहमीच १०० टक्के लागत असून १६ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे.  आमच्या माजी विद्यार्थ्यांचे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मोठे योगदान आहे. कोल्हापूरच्या विकासात आणि प्रगतीत असोसिएशनचे मोठे योगदान असून यापुढेही कोल्हापूरच्या विकासात सदैव पुढाकार घेईल याची आपल्याला खात्री आहे. 

यावेळी प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये यापुढे रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा वापर करावा अशी सूचना डॉ. पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये मेडिकल कॉलेजची सर्वाधिक इंच इमारत बांधण्याचे काम हाती  घेतले आहे. त्याचबरोबर  हॉटेल सयाजीचे विस्तारीकरणही सुरु केले आहे. कोल्हापूरमध्ये खुप टलेंट असून हॉटेलच्या 23 मजली इमारतीच्या कामासाठी आर्किटेक्ट काम कोल्हापूरची सुरुची संभाजी पाटील ही मुलगी करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितले.

 असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या कामाची माहिती दिली. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कार्जींन्नी यांनी  इंजिनियर्स डे निमित्त विशेष व्याख्यानात डॉ.एम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णात जमदाडे यांनी केले तर आभर असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी मानले. यावेळी असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, अल्ट्राटेक सिमेंटचे शितलराज सिंदखेडे, अविनाश जेऊरकर, सागर छांगनी यांच्यासह आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनचे संचालक आणि सदस्य उपस्थित होते.