संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५ महोत्सव उत्साहात संपन्न

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ उमंग २के२५ हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुहास पाटील, समता तेलंग सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व इव्हेंट समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वस्त विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थी मित्रांनो चौकटी बाहेर येऊन स्वतःला ओळखणं अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये स्वयंउस्फुर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य विकसित करून ऐच्छिक उद्देशा पर्यंत पोहोचण्यासाठी या विविध गोष्टींची आवश्यकता असते आणि ती संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात सर्व विभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो. संचालक डॉ. विराट गिरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून विविध विभागांतर्गत उल्लेखनीय केलेल्या कार्याचे सादरीकरण केले.
उमंग २के२५ सहा दिवस चाललेल्या महोत्सव मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. राष्ट्रीय स्तरावरील "निंबस २के२५" स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. प्रतिक आवटी प्रा. तृप्ती पुजारी, यांनी काम पहिले. नृत्य, गायन, नाटक, फॅशन शो, पारंपरिक दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मेहंदी, वादविवाद, रांगोळी, नेल-आर्ट, हेअरस्टाईल स्पर्धा, काव्य वाचन, एक्सटेम्पोर, आणि कुकिंग विदाऊट फायर यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 'उद्योग सुरक्षा आणि आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवाचे प्रा. सुहास पाटील आणि समता तेलंग हे प्रमुख समन्वयक होते. त्यांनी अतिशय उत्तम नियोजन करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमंग २के२५ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.