कोरे पॉलिटेक्निकमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

वारणानगर प्रतिनिधी : वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव विश्ववेध २०२५ उत्साहात पार पडला. महोत्सवाचे उद्घाटन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी व प्राचार्य पी. आर. पाटील, मागदर्शक डॉ. पी एम पाटील यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व तसेच खिलाडूवृत्ती, संयम याबाबत डॉ. कार्जिनी यांनी मार्गदर्शन केले.
महोत्सवात वैयक्तिक व सांघिक अशा एकूण ९ क्रीडा स्पर्धा झाल्या. २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. क्रीडा महोत्सव पार पाडण्यासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. महोत्सवासाठी संस्थेचे क्रीडाशिक्षक एस. एस. चव्हाण, मुख्य समन्वयक एस. व्ही. पाटील व इतर विभागीय समन्वयक , सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.