जिल्हा परिषदेच्या प्रांगणात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा

 कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. यांचे हस्ते ध्वजारोहण करून साजरा करणेत आला. यावेळी उपस्थितानी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन केले व त्यानंतर जि प च्या कलामंचाच्या कलाकारांद्वारे देशभक्तीपर गीत गायन सादर केले.

              हरघर तिरंगा अभियान अन्वये तिरंगा शपथ घेणेत आली व हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा , जय हिंद असे कॅनव्हासवर मुख्य कार्यकारी अधिकारी, खाते प्रमुख व कर्मचारी यांच्या वतीने लिहून अभियान राबविण्यात आले.

            याप्रसंगी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे , माधुरी परीट प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता), कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सागांवकर, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.)अर्जुन गोळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे , अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा कृषि अधिकारी अभयकुमार चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर ,अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त् अधिकारी अरुणा हसबे इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.