सस्मिता मोहंती यांना आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड
हातकणंगले (प्रतिनिधी) : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांना 'पोदार वर्ल्ड' कॉलेजने प्रख्यात शिक्षणतज्ञ म्हणून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी 'आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड' देऊन सन्मानित केले. हा कार्यक्रम हॉटेल सी प्रिन्सेस, जुहू, मुंबई येथे 13 जुलै रोजी संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. डॉ. वंदना लुल्ला, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि पोदार वर्ल्ड कॉलेजच्या डीन, समीर कोचर, प्रख्यात
अभिनेते, मिस्टर स्टीव्हन हिली, जागतिक फॅशन ब्रँडशी संबंधित फॅशन आयकॉन, झारा, जसपाल साहनी, टाटा समूहाचे जागतिक आयटी सुरक्षा अधिकारी, रायन ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक, डॉ. स्नेहल पिंटो, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक, शेरोनी मलिक या सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यापूर्वी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सस्मिता मोहंती यांचा ‘सिंघानिया एज्युकेशन एक्सलन्स अॅवार्ड २०२२’ हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मोहंती यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. याव्यतिरिक्त ही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देत विविध सहशालेय उपक्रम व उत्कृष्ट निकालाची परंपरा, नवोपक्रमशीलता संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने जोपासली आहे. याचे सर्व श्रेय सस्मिता मोहंती यांना जाते. कोविड काळात ऑनलाईन शाळा हा उपक्रम महाराष्ट्रात सर्वात प्रथम सस्मिता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली घोडावत स्कूलने राबवला. उत्तम नियोजन, शिस्तबद्ध कामकाज, कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणावर भर ही सस्मिता मोहंती यांची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षिका अशी त्यांची महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ख्याती आहे. सी.बी.एस.ई, सी.ए.आय.ई, आय.बी.डी.पी, अश्या सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची द्वारे विद्यार्थ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. 'सहोदया कोल्हापूर' या सी.बी.एस.ई स्कूल समूहाच्या त्या संस्थापिका अध्यक्षा आहेत. सस्मिता मोहंती यांच्या या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुस्कार त्यांना प्राप्त झाला. संजय घोडावत स्कूलचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सस्मिता मोहंती यांच्या कार्याचे यावेळी कौतुक केले. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यामार्फतही हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सस्मिता मोहंती यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्काराबद्दल शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक होत आहे.