मुंबई वरळी अपघात प्रकरण: प्रमुख आरोपी मिहीर शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई प्रतिनिधी: मुंबईतील वरळी परिसरात ७ जुलै रोजी घडलेल्या भयंकर अपघात प्रकरणात प्रमुख आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी आज (१६ जुलै) न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून मिहीर शाह याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू (BMW) कार चालवत एका दाम्पत्याला उडवलं होतं. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला तर प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मिहीर फरार झाला होता, परंतु दोन दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली.मिहीर हा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघातानंतर मिहीरने दाढी व केस कापून पलायन केलं होतं. त्याच्या आई आणि दोन मोठ्या बहिणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने ६० तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक केली.