प्रा. डॉ. राजेंद्र पारिजात यांना मातृशोक
कोल्हापूर : सायबर महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्र पारिजात यांच्या मातोश्री वसुमती पांडुरंग जोशी यांचे दि. 9 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने कोल्हापूर येथे निधन झाले.विवाहानंतर पती पी . व्ही . जोशी तथा सविता पारिजात यांच्या बरोबर कोल्हापूरला १९६४ ला आल्यावर शेवटपर्यंत कोल्हापूर येथेच राहिल्या.
विवाहानंतर डीएड चे शिक्षण पुर्ण करुन रा.ना. सामाणी विद्यालय येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली.पती सविता पारिजात यांच्या बरोबरीने पावसच्या स्वामी स्वरूपानंद यांच्या थेट अनुग्रहाचा लाभ त्यांना झाला होता. पतीबरोबर भक्त सेवा तसेच अनेक सत्संग कार्यक्रमात सहभागी झाली. श्रीमत स्वामी सत्य देवानंद सरस्वती (स्वामी स्वरूपानंद यांच्या परमशिष्यांपैकी एक) यांचे कोल्हापूर वास्तव्य आमच्या शाळीग्राम वाड्यातील घरात असताना सुमारे वर्षभर स्वामीजी सविता पारिजात यांना भगवद्गीता शिकवण्यास आले होते. त्यावेळेस सर्व प्रकारची सेवा त्यांच्या हातून झाली. त्या ठिकाणी सलग ज्ञानेश्वरी प्रवचने त्या छोट्या घरात होत राहिले .या सगळ्यांमध्ये सर्व आहियक जबाबदाऱ्या तिने पतीसाठी सांभाळल्या.
गोष्टी वेल्हाळ स्वभाव आणि शिक्षकी बाणा यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वेगळा ठसा उमटवला होता.स्पष्ट वक्तेपणा आणि अपार कष्ट घेऊन त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले.पतीच्या निधनानंतर 24 वर्षे निवृत्त आयुष्य जगत असताना अलीकडे रामकृष्ण विवेकानंद केंद्र राजारामपुरी कोल्हापूर येथे त्या जात असत तसेच चिन्मय मिशनच्या सत्संगास त्या विशेष करून कधी कधी सहभागी होत असत.
त्यांच्या मागे मुलगा डॉ. राजेंद्र जोशी पारिजात ,सून चित्रकार सरोज पारिजात,नात लंडन स्थित नृत्य अभ्यासक वेणू पारिजात चौकनीस,नात जावई सॉफ्टवेअर इंजिनियर ॲमेझॉन स्वप्नील चौकनीस,मुलगी एल आय सी कर्मचारी प्राजक्ता जमदग्नी,जावई उद्योजक प्रमोद जमदग्नी,नातू अमेरिका स्थित मेकॅनिकल आॅटोमेशन इंजिनिअर सात्विक जमदग्नी, सॉफ्टवेअर इंजिनीयर अवनी जमदग्नी यासह बराच मोठा परिवार आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि गरिबांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून नेहमी गुप्त दान करण्याची त्यांना सवय होती.आपले बालपणीचे कष्ट आठवण काढत त्या सर्वांशी कळकळीने बोलायच्या.