अनिल बागणे यांची राज्य असोसिएशनच्या विविध पदांवर निवड ..!

अनिल बागणे यांची राज्य असोसिएशनच्या विविध पदांवर निवड ..!

कोल्हापूर -  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांची महाराष्ट्र राज्य स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व प्रभावी संघटनांमध्ये विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे. यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग असोसिएशनच्या चीफ सेक्रेटरी, कृषी महाविद्यालय असोसिएशनच्या केंद्रीय खजिनदार तर डिग्री इंजिनिअरिंग असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाली आहे. 

बागणे यांची महाराष्ट्र राज्यातील डिप्लोमा इंस्टिट्युटस मॅनेजमेंटस असोसिएशनच्या मुख्य सचिवपदी, कृषी व कृषी सलंग्न महाविद्यालय व पॉलिटेक्निक मॅनेजमेंटस असोसिएशनच्या केंद्रीय खजिनदारपदी तसेच इजिनिअरंग महाविद्यालय मॅनेजमेंटस असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाली आहे. 

या महाराष्ट्र राज्य पॉलिटेक्निक, ऍग्रीकल्चर व इंजिनीअरिंग असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत ह्या निवडी झाल्या. या पदाचा कार्यकाल फेब्रुवारी २०३० पर्यंत असून राज्यातील बहुतांशी महाविद्यालये या संघटनेशी सलंग्न आहेत. 

संघटना राज्यातील महाविद्यालयांचे विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत आहे. महाविद्यालये व शासन यांच्यामधील दुवा म्हणूनही संघटना काम करते. राज्यातील महाविद्यालयांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून आग्रही मांडणीमुळे मार्गी लागले आहेत.

बागणे यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदान, दूरदृष्टी, नेतृत्वगुण तसेच गेल्या दिड दशकात त्यांनी शिक्षण क्षेत्रात 'शरद पॅटर्न'चे जनक म्हणून क्रांतिकारक व प्रभावी बदल घडवून आणले आहेत. जे विद्यार्थी व पालकांच्या हिताचे असून त्यांचे अनुकरण राज्यभरात होताना दिसते.