करुंगळे (ता.शाहूवाडी) येथील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ

करुंगळे (ता.शाहूवाडी) येथील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते 

करुंगळे गावात ७ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ पार पडला.

शाहूवाडी तालुक्यातील करुंगळे गावातील देऊळवाडी मेन रस्ता ते वंजारवाडी पर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - ५० लाख, मुख्य रस्ता ते मधली वाडीतील दलित वस्तीतील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - ३० लाख, मुख्य रस्ता ते वीर गल्ली - सुतार गल्ली - लोहारवाडीतील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - २९ लाख, सुतारवाडी येथील हरिजन वस्तीमध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत पेयजल योजना करणे - १ कोटी २५ लाख.

करूंगळे पैकी सुतारवाडी प्राथमिक शाळा दुरुस्त करणे - १० लाख, करुंगळे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे - १८ लाख,करुंगळे - कळंत्रेवाडी - वीरवाडी - खोतवाडी - कडवे जोडणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - २ कोटी,करंगळे ते लोळाने रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - ३ कोटी अशा एकूण ७ कोटी ६२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या व गावातील ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, माजी बांधकाम सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),शाहूवाडी पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत,महादेव पाटील, सुभाष इनामदार,करुंगळे गावचे लोकनियुक्त सरपंच माधव कळंत्रे,उपसरपंच बाजीराव पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एन.बी.पाटील (सर),माजी सरपंच नथुराम नांदगावकर,लोळाने गावचे सरपंच शंकर पाटील,दामोदर कळंत्रे,शंकर वारंग,दिलीप वीर,बाजीराव कळंत्रे,नामदेव ढोके,श्रीपती पाटील - आलतूर यांच्यासह सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.