"१०० हून अधिक चित्रपटांमध्ये झळकलेला हा अभिनेता! अभिनयातली जादू अजूनही कायम"

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना प्रेक्षक त्यांच्या नावाने नाही तर त्यांच्या उत्तम अभिनयामुळे ओळखले जाते. फोटोतला मुलगा देखील असा कलाकार आहे ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतले. काही कलाकृती मध्ये त्याने हसवले तर काहीमध्ये डोळ्यातून अश्रू आणायला भाग पाडले. हा कलाकार वर्षानुवर्षे अभिनेता म्हणून नव्हे तर वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिकेत पडद्यावर आपली अमिट छाप सोडत आहे. या अभिनेत्याने अत्यंत गंभीर भूमिकांमध्येही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. हा अभिनेता गेल्या ४० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या अभिनेत्याने आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हा दिग्गज अभिनेता कोण आहे?
इथे आपण ज्येष्ठ अभिनेते सौरभ शुक्लाबद्दल बोलत आहोत. हे तेच आहेत ज्यांनी जॉली एलएलबीमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत ठसा उमटवला आहे. १९६३ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जन्मलेल्या सौरभला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. त्यांचे आईवडील शास्त्रीय संगीतात पारंगत होते. असे म्हटले जाते की सौरभची आई जोगमाया शुक्ला या भारतीय संगीतातील पहिली तबला वादक आहे. सौरभ २ वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीला आले.
दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्याने १९८४ मध्ये रंगभूमीवर प्रवेश केला. रंगभूमीच्या माध्यमातून या अभिनेत्याला ओळख मिळाली आणि १९९१ मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रतिष्ठित 'द रेपर्टोअर कंपनी'मध्ये स्थान मिळवले. मिस्टर इंडियाचे दिग्दर्शक शेखर कपूर सौरभच्या अभिनयाने खूप खुश झाले आणि त्यांनी त्याला बॅंडिट क्वीन (१९९४) या चित्रपटात मोठा ब्रेक दिला.
१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्या' चित्रपटात सौरभ शुक्ला यांनी 'कल्लू मामा'ची भूमिका साकारली होती, जी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. यानंतर सौरभने कधीही मागे वळून पाहिले नाही. या अभिनेत्याने ताल, बादशाह, आरक्षण, गुंडे, नायक, बर्फी, किक, ओएमजी आणि पीके सारख्या उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सौरभ शुक्ला आता ६२ वर्षांचे आहेत. अजूनही ते सिनेमांमध्ये कार्यरत आहेत. सौरभ यांनी आतापर्यंत तिन्ही खानांसोबत काम केले आहे. सौरभच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले ते जॉली एलएलबी ३, आयडेंटिटी कार्ड, नो रुल्स फॉर फूल्स आणि मनोहर पांडे यांसारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.