HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

घटस्फोटावर पहिल्यांदाच थेट बोलली तेजश्री प्रधान , म्हणाली...

घटस्फोटावर पहिल्यांदाच थेट बोलली तेजश्री प्रधान , म्हणाली...

मुंबई : अभिनेत्री तेजश्री प्रधानची तिच्या व्यवसायिक आयुष्या सोबतच वैयक्तिक आयुष्याची सुद्धा चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अचानक तिने तिची स्टार प्रवाह वर गाजत असलेली प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडत असल्याचे जाहीर केले. तिच्या चाहत्यांसाठी हा अनपेक्षित धक्का होता. 


अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने वयाच्या पंचविशीत अभिनेता शशांक केतकर सोबत लग्न केलेले. दोघांनी होणार सुन मी या घरची या मालिकेत श्री आणि जान्हवी ही भूमिका साकारली होती. त्याकाळी ही मालिका तुफान गाजली सोबतच त्यांची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र वर्षभरातच दोघांचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं होतं तिने स्वतःला असं सावरलं याबाबत सांगितलं. मुक्काम पोस्ट मनोरंजन ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री म्हणाली की, मला वाटतं अशा परिस्थितीत दैवच तुम्हाला बळ देतं. ते येतच तुमच्यात. जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीतरी चुकतंय तेव्हा ते बळ येतं आणि तुम्ही करून मोकळे होता. आज विचार केला तर त्या गोष्टी आता अवघड वाटतात त्यामुळे ते बळ त्या परिस्थितीत येते, त्याची गरज संपली की कमी होऊन जाते असं मला वाटतं.

तेजश्री ने पुढे सांगितले की, दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले जीवनसाथी असतीलच असं नाही. आजकाल आपण या विषयांवर अगदी सहज बोलतो म्हणून मला सांगायला आवडेल की एक महत्त्वाची गोष्ट जी मी माझ्या बाबतीत केली. ती म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडलं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही. मला काहीतरी महान बोलायचय म्हणून नाही तर माणूस म्हणून सांगते की ज्याने आपल्याला दुखावले किंवा जो व्यक्ती माझ्यामुळे दुखावलाय या दोन माणसांमध्ये आपण त्या माणसाला इतकं महत्त्व द्यायचं नाही की आपल्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झालीये. जे झालंय ते माझ्या नशिबात होतं, ते होणार होतच.

त्यासाठी मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठा करते. आज माझ्या आयुष्यात जे घडतंय त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू? हे माझा आयुष्य आहे आणि ते मोलाचं आहे. त्यात जे काही घडतंय ते माझ्या इच्छेने आणि धैर्य आणि घडतंय. तुम्ही एवढे महत्त्वाचे निर्णय घेता तेव्हा ती सोपी गोष्ट नसते. लोक बोलतच राहतात स्वयंघोषित शेजारी अशी माणसं विशेषच असतात. आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे बघायला समाजाला खूप वेळ आहे. एखादं नातं तुटणं ही वाईट गोष्ट आहे आणि ती दोन्ही कुटुंबासाठी वाईटच गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही नका आमच्या घरात शिरू. आम्ही तुमच्या घरात डोकावून पाहते का?

तेजश्री प्रधानच्या कामाबाबतीत बोलायच झाल्यास ती नवनवीन प्रोजेक्टवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे. तेजश्री शेवटची स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसली होती. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.