आसुर्ले च्या सरदारने केला डिलिव्हरी बॉय ते पोलीस पर्यंतचा प्रवास

आसुर्ले च्या सरदारने केला डिलिव्हरी बॉय ते पोलीस पर्यंतचा प्रवास

पन्हाळा (माधुरी मस्कर) : डिलिवरी बॅाय, हॅाटेलात वेटर, सेंट्रिंगचे काम, साखर कारखान्यात काम, झाडे तोडण्याचे काम, सरकारी कार्यालयात टायपिंगचे काम अशी मिळेल ती काम करून आणि पोटपुरत्या शेतीसह जनावरे सांभाळत आसुर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्तात्रय सरदार दुबूले कोल्हापूर पोलिस दलात भरती झाला.गेल्या बारा वर्षात प्रत्येक भरतीत एक, दोन गुणात हुलकावण्या, आज पोलिस भरतीत शेवटच्या संधीने यशाला गवसणी घातली आणि मुलगा पोलिस झाल्याचे पाहून आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. 

 प्रशासकीय सेवेत काम करण्याची प्रबळ इच्छा लहानपणापासून त्याला होती.म्हणून  त्याने शेतीतसह जनावरे आणि मिळेल ती काम करून बारा वर्षे सरावासाठी घाम गाळत होता. प्रत्येकवेळेला एक दोन गुणात संधी जात होती, मात्र त्याने आशा सोडली नाही. नऊवेळा संधी गमवलेल्या दत्तांन अखेर नशीबाने साथ दिल्याने शेवटच्या संधीने त्याच्या आयुष्यच बदलून टाकले.गरीबीशी झगडणाऱ्या दत्तांने कामात लाज बाळगली नाही.मिळेल तेथे काम करून घरखर्चासह शिक्षणाचा खर्च करणाऱ्या त्याने वेळप्रसंगी गोठ्यातील जनावरे विकून शिक्षणाचा खर्च केला, पण पोलिस भरतीची आशा सोडली नाही.मुलाच्या आशावादी विचाराला आईची सुध्दा तेवढीच साथ मिळाली.सराव आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर पोलिस झालेल्या दत्तांच्या मित्रांनी वर्गणी गोळा केली आणि गावातून त्यांची मिरवणूक काढून आनंदोत्स साजरा केला.