जिल्हा परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

जिल्हा परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी)   संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. ५००० वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग् विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तिच्या शारिरीक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या साहाय्यिभूत आहे. योगाभ्यासाचे महत्व लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदत  २१ जून रोजी सकाळी ठिक ६.३० वाजता योगाची प्रात्याक्षिके करून योगदिन साजरा करणेत आला. 

तसेच जि.प.अंतर्गत सर्व पंचायत समित्यांमध्ये सकाळी ठिक ६.३० ते ८.३० या वेळेत प्रात्याक्षिकासह साजरा करणेत आला. 

            योगशिक्षिका एैश्वर्या पाटील यांनी जिल्हा परिषद येथे प्रात्याक्षिकांसह योगासनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. ,सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) शिल्पा पाटील , अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर ,डॉ. सुशांत रेवडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, वित्त् विभागाकडील लेखाधिकारी कृष्णात पाटील व जिल्हापरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.