मैत्री दिनानिमित्त दोस्ती फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण

मैत्री दिनानिमित्त दोस्ती फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :अगदी लहानपणापासून एकत्र असणारे साधारणपणे 30 वर्षापासून एकमेकांशी खेळत  मोठे झालेले मित्र आजही त्याच आनंदात एकत्र आहेत. एकमेकांचा वाढदिवस करणे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, असे  सख्ख्या भावांप्रमाणे एकत्रित राहणारी ही सर्व मंडळी.

    या दोस्तीच्या माध्यमातूनच सामाजिक काम करण्यासाठी  दोस्ती फाउंडेशन ची स्थापना केली.  त्या अनुषंगाने आज दोस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यामंदिर टोप या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आल.

 सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खड्डे काढण्यापासून, माती गोळा करणे, झाडांची निवड करणे, झाडे आणणे लावणे, खत घालणे व त्यांना आळी करणे अशी वेगवेगळी कामे ह्या मित्रांनी एकजुटीने केली आणि आजचा मैत्री दिन अतिशय उत्साहात आनंदात एक सामाजिक उपक्रम पूर्ण करत संपन्न केला.

       यामध्ये  टोप गावातील रवींद्र मिसाळ, बालाजी पांढरे,  संदीप पाटील, सचिन गायकवाड, दीपक पाटील, योगेश देसाई, अमित पाटील, नवदीप घोरपडे, अमोल पाटील, विश्वजीत लोहार, नेताजी पाटील, अजित पाटील, संतोष गायकवाड, सागर एस पाटील, अभिषेक ढवाळे, अमर पाटील, अमोल कदम, योगेश सुतार, सागर टी पाटील, सुनील कोपर्डे, प्रदीप गोंधळी, प्रकाश मुळीक व फाउंडेशनच्या एकमेव महिला सदस्य अमृता या सर्वांनी उपक्रमाच्या परिपूर्तीसाठी विशेष कष्ट घेतले व सहकार्य केले.