नुतन खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून कोल्हापूर मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. संदर्भात नूतन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शाहू महाराजांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोल्हापूरच्या विकास कामासंदर्भात चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, रश्मीताई ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.