कागलमधील निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशा दोन प्रवृत्तीत- राजे समरजितसिंह घाटगे
उत्तूर (प्रतिनिधी) : कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात आता निष्ठा या शब्दाचे महत्त्व दाखवून देण्याची वेळ आली आहे.ज्या लोकांनी आपल्याला मोठे केले त्याच लोकांना सोडून काहीजण राजकारण करताहेत. ज्यांनी निष्ठेचा सौदा केलेला आहे त्यांना उत्तर दिले पाहिजे.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक समरजितसिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी राहिलेली नाही तर निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी झालेली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
सोहाळे ता.आजरा येथे झालेल्या संपर्क मेळाव्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच भारती डेळेकर होत्या.
घाटगे पुढे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विकास कामापेक्षा माझ्यासह कुटुंबावर मोठ्या प्रमाणात होणा-या टिकेकडे मी फारसे लक्ष देत नाही.उत्तूरमध्ये आयुर्वेदिक कॉलेज मंजूर झाले ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आजरा व उत्तूरमधील शासकीय आरोग्य केंद्रांना निधी मिळाला पाहिजे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ लागेल सर्वसामान्य माणसांची सेवा करणे हे माझ्या घराण्याच्या रक्तात आहे.त्यामुळे लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी द्या.
अध्यक्षीय मनोगतात सरपंच डेळेकर म्हणाल्या,पालकमंत्र्यांकडे भल्या पहाटे चकरा मारूनही शाळेसह गावातील इतर विकास कामासाठी निधी दिला नाही.त्यामुळे सर्वांगिण विकासासाठी शाश्वत विकासाची ध्येय असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांना येत्या निवडणुकीत हक्काचा आमदार म्हणून निवडून देऊया.
यावेळी जनार्दन निउंगरे,सदाशिव डेळेकर,तुकाराम देसाई,वसंत देसाई,रणजीत देसाई,आनंदा कांबळे, सुभाष देसाई,राजेंद्र दोरुगडे,शिवाजी दोरुगडे,मारुती दोरुगडे,तानाजी कांबळे,रविंद्र कांबळे,सुधीर कांबळे, विलास देसाई,मदन देसाई, ग्रामपंचायत सदस्या रमा कांबळे, उषा कांबळे,आनंदा पवार,शिवाजी कोंडुसकर,प्रकाश कोंडुसकर, गणपती पाटील,दत्ता पवार आदी उपस्थित होते.
हे तर माझे कुटुंबच
ही निवडणुक कागल गडहिंग्लज उत्तूर विभागाच्या विकासासाठीच्या परिवर्तनाची आहे.त्यासाठी आपल्या सगळ्यांचे साथ राहू दे. लोकसेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास मी कटिबद्ध आहे.कागलच्या स्वराज्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.मी सर्व ठिकाणी पोचू शकत नाही. कागल गडहिंग्लज उत्तूर विभाग हे माझे कुटुंबच आहे.या कुटुंबातील सदस्यांनी माझ्या वतीने लोकांपर्यंत पोहोचावे.