केआयटीमध्ये प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात साजरी

केआयटीमध्ये प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केआयटी च्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. टेक. साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची  स्वागत सभा तीन सत्रात  उत्साहात पार पडली. सर्व शाखांचे एकूण  ९०० पालक या स्वागत सभेस उपस्थित होते. 

केआयटी आयमर चे संचालक विश्वस्त सुनील कुलकर्णी यांनी सर्वप्रथम केआयटी सारख्या दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी निरनिराळी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज स्पष्ट केली. 

या सभेस संबोधित करताना संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलत्या गरजांचा आढावा घेऊन येत्या काळामध्ये अभियंत्यांना विविध क्षेत्रात कोणकोणत्या संधी असतील याची महिती देऊन  त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना तयारी करणे आवश्यक आहे असे नमूद केले. संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी करिअर च्या दृष्टीने संस्थेत सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी महाविद्यालयात लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल थोडक्यात माहिती करून दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा, अभियांत्रिकीसाठी भविष्यात असणाऱ्या उज्वल संधी तसेच महाविद्यालयाला शासनाकडून अनुदान मिळालेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. 

विद्यार्थी प्रशिक्षण व नियुक्ती अधिष्ठाता डॉ. अमित सरकार यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने दिल्या जात असणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची तसेच भरती साठी येणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली.

प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.दत्तात्रय साठे यांनी पालक सभेचा उद्देश व प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील शैक्षणिक अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धतीची माहिती दिली.  या सभेस उपस्थित राहिलेल्या पालकांनी केआयटी मध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून महाविद्यालयातील  एकूण  शिस्त व सर्व उपक्रमांची माहिती ऐकून समाधान वाटल्याचे नमूद केले. 

डॉ.दीप्ती कुलकर्णी आणि प्रा. क्षितिजा ताशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी आभार मानले.