उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देणारे शरद पॉलिटेक्निक : डॉ. गणेश इल्लामल्ले

उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देणारे शरद पॉलिटेक्निक : डॉ. गणेश इल्लामल्ले

यड्राव प्रतिनिधी  : “ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून शरद पॉलिटेक्निक समोर आली आहे. महाविद्यालयाची प्रगती वाखाण्याजोगी आहे. संपूर्ण जगाचे भारत हे बाजारपेठ म्हणून पाहात आहे. हि मोछी संधी आहे. नवनवीन तंत्रज्ञान देशात येत असून त्याचा उपयोग करुन या संधीचे उपयोग प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्याने करुन घ्यावा. असे प्रतिपादन गरवारे फुलफ्लेक्स इंडियाचे जनरल मॅनेंजर डॉ. गणेश इल्लामल्ले यांनी केले. 

ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते. यावेळी राष्ट्रीय खो-खो चॅम्पियन वैष्णवी पोवार प्रमुख अतिथी होते. 

 इल्लामल्ले पुढे म्हणाले, एआय मुळे औद्योगिक विश्वात नवीन क्रांती होत आहे. भारतीयांचे विचार करण्याची पध्दत अनोखे आहे. त्याची जगभरात मागणी आहे. आपल्यात जी क्षमता, कौशल्य, ज्ञान या सर्वाचे जगासमोर सादरीकरण व्हायला हवे, मगच संधी मिळेल. कोणतेही काम हे काम म्हणून करु नको. ते तळमळीने, आवडीने करा. तुम्हाला नक्की यश मिळेल.

वैष्णवी पोवार म्हणाल्या, लहानपणापासून खेळाची आवड होते. मला वडील, कुटुंबिय, प्रशिक्षक यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. सरावातील सातत्य आणि जिद्द या जोरावर मी मोठे स्वप्न पहात आहे. तुम्ही जे क्षेत्र निवडला आहात त्यात झोकून देवून काम करा. तुम्हीही यशस्वी व्हाल.   

अनिल बागणे म्हणाले, समाजात शदर पॅटर्न यशस्वी झाला आहे त्याचे श्रेय हे विद्यार्थी, प्राध्यापक, पालक यांचे आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहोत. शरदने गुणवत्तेचे सर्व मापदंड पूर्ण केलेले असून भविष्यात समाज निर्व्यसनी व संस्कारीत रहावा यासाठी कार्यकत राहील.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. ताशिलदार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी उत्कृष्ट विद्यार्थी सोहम पांढरपट्टे तर उत्कृष्ट वस्तीगृह विद्यार्थी सतिशकुमार यादव, विद्यार्थीनी प्रज्ञा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. 

दरम्यान दोन दिवसांमध्ये पारंपरिकदिन, रेकॉर्ड व पेपर फिशपॉन्ड, फॅशनशो, रांगोळी, मेहंदी, पाककला, सॅलेड डेकोरेशन यासह क्रिकेट, हॉलीबॉल, कब्बडी, खो-खो, अथलेटीक्स, बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबलटेनिस विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य बी.एस. ताशिलदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दिपाली पाटील, प्रा. रामेश्वरी करोशी, एलआर प्रणाली पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व डीन, विभागप्रमुख, क्रिडा विभागाचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुजा जुगळे व प्रा. एस.पी. सरदेसाई यांनी केले. आभार जीएस गणेश ततगुंटी यांनी मानले.