कै.विनायकराव क्षीरसागर यांना सर्वपक्षीय मान्यवरांकडून आदरांजली

कै.विनायकराव क्षीरसागर यांना सर्वपक्षीय मान्यवरांकडून आदरांजली

     राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायकराव क्षीरसागर यांचे २४ मार्च रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक सभागृह येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून कै.विनायकराव क्षीरसागर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळी भरून निघणार नसल्याचे सांगत क्षीरसागर कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी असल्याचे सांगितले.या

वेळी माजी महापौर महादेव आडगुळे यांनी प्रमुख मनोगत व्यक्त केले. यासह खासदार धनंजय महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आदिल फरास, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आर.के.पोवार, अनिल घाटगे, आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, हिंदू एकता आंदोलनचे गजानन तोडकर, मुस्लीम बोर्डिंगचे कादर मलबारी, नागरी कृती समितीचे अशोक पोवार, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, आदींनी मनोगताद्वारे आदरांजली वाहिली.