कोजिमाशि'त सभासदांना निवृत्तीनंतरही सदस्यत्व :दादा लाड

कोजिमाशि'त सभासदांना निवृत्तीनंतरही सदस्यत्व :दादा लाड

कोल्हापूर (प्रतिनिधि) : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेने ठेवीचा सहाशे कोटींचा टप्पा ओलांडला असून, निवृत्तीनंतरही सभासदांचे सभासदत्व कायम राहणार, असे शिक्षक नेते दादा लाड यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्याध्यापक संघात नवनियुक्त शाखा समिती सदस्य व प्रधान कार्यालय उपससमिती सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नवीन १४ शाखांच्या समिती सदस्यांचा व प्रधान कार्यालयांमध्ये असलेल्या सहा उपसमिती सदस्यांचा अशा एकूण शंभर सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, खजानिस सागर चुडाप्पा, दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व सत्कार शिक्षक नेते लाड, अध्यक्ष मदन निकम, उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लक्ष्मण सखाराम डेळेकर, अनिल चव्हाण, दत्तात्रय घुगरे, राजेंद्र रानमाळे, शरद तावदारे, पांडुरंग हळदकर, दीपक पाटील, सुभाष खामकर, मनोहर पाटील, अविनाश चौगुले, राजाराम शिंदे, जितेंद्र म्हैशाळे, शीतल हिरेमठ, आदी उपस्थित होते. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.