राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले
कोल्हापूर (प्रतिनिधि) : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा झोडपून काढले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यात देखिल पावसाचा जोर होता. परिणामी, पंचगंगा नदी पाणी पातळी सध्या 43 फूट 3 इंचावर पोचली आहे. तर जिल्ह्यातील एकूण 70 बंधारे ही पाण्याखाली गेली आहे. आज सकाळी ठीक सहा वाजता राधानगरी धरणाचा सात ही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणक्षेत्रात मुसळधार पावूस सुरू असून धरण 100% भरले आहे. धरणाची एकूण 7 द्वारे ( क्र.1,2,3,4,5,6,7) उघडली आहेत. या धरणाच्या -7 दरवाजा मधून 10000 cusec हितका विसर्ग सुरू असून, विद्युतगृह साठी 1500 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे पुन्हा पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेली दोन दिवस पावसानं थोडी उघडीप घेतली होती. परिणामी पंचगंगा पाणी पातळीत घट होत आहे. राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याने , पुन्हा पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.