शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा-रेणुका देवी देशमुख
इस्लांमपूर (प्रतिनिधी ): राज्यातील भाजपा मित्र पक्षाचे महायुती सरकार लोकांच्या कल्याणकारी योजना राबवत आहे. सर्व शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन निनाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव रेणुकादेवी सत्यजित देशमुख यांनी केले.
कासेगाव (ता. वाळवा ) येथे बांधकाम कामगार मेळावा, भांडी साहित्य वाटप आणि विश्वकर्मा लाभार्थी प्रमाणपत्र वाटप आयोजित मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी संजय पाटील मेंबर, संचालक शंकरराव पाटील ,अशोक शिंदे पांडुरंग वाघमोडे , महेंद्र पाटील, अक्षय गावडे ,विजय पाटील, , अँड. कौस्तुभ मिरजकर , गणेश साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या, सध्याच्या महायुती सरकारने महिलासाठी एस.टी. भाडे पन्नास टक्के, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, आशा, गटप्रवर्तक यांना मानधन भरघोस वाढ, मुलींना उच्चशिक्षण मोफत, महिलांना स्वंयरोजगार अशा अनेक शासन कल्याणकारी योजना सामान्य लोकांच्या प्रगतीसाठी राबवत आहेत. योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा नेते सत्यजित
देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली टीम सत्यजित सातत्याने प्रयत्नशील राहील. सर्वांच्या आशिर्वादामुळे पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल. या कार्यक्रमास संजय पाटील, दिनकर जाधव , सुभाष पाटील, पुष्पा वगरे, सुनिता पाटील, गिता साठे, शारदा हुबाले यांच्यासह परिसरातील महिलावर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश साठे यांनी संयोजन केले.