कोरे अभियांत्रिकेच्यावतीने २५० वृक्षारोपण
कोल्हापूर (प्रतिनिधि) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग, एनएसएस विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या एनसीसी व श्रीमती भा. रा.यादव हायस्कूल सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने बच्चे सावर्डेच्या खडीचा डोंगरावर २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा खडीचा डोंगर सावर्डे गावाचे फुफ्फुस म्हणुन ओळखलं जातं. या हायस्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी रोपे लावण्यासाठी लागणारे खड्डे दोन तासातच तयार केले.
त्यामध्ये वड, पिंपळ, निंब, बेहडा, उंबर, जांभुळ, चिंच, कदंब अशा देशी प्रजातीच्या वेगवेगळ्या जातीची झाडे महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या रोपांच्या संवर्धनासाठी सावर्डे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी सावर्डे हायस्कूल मधील शिक्षकांनी सांगितले आम्ही प्रत्येक झाडाला त्या विद्यार्थ्याचं नाव देणार आहोत व ते झाडाचे लहान बाळाला सांभाळतो त्या पद्धतीने पाच वर्ष त्याचे संगोपन करणार आहोत.
वृक्षारोपणासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, मा. डॉ विनयरावजी कोरे, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ व्ही. व्ही. कारजिन्नी आणि यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी डीन डॉ. एस. एम. पिसे, प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, प्रा. रणजीत नाईक, डॉ. एस. एस. खोत, प्रा गणेश कांबळे, प्रा. वरवंटे, प्रा. आर. जी. क्षीरसागर, प्रा. गायकवाड, प्रा. सविथा, सावर्डे हायस्कूलचे पी.आर.पाटील, आण्णा पाटील, गुरव सर, शिपाई आप्पा व विद्यार्थी, डॉ.अंकुश यादव, महेश बच्चे, सुरेश माळकर, पोलीस पाटील सागर यादव उपस्थित होते.