कोल्हापुरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी विजय चव्हाण

कोल्हापुरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी विजय चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. यावेळी विविध संस्था, संघटना, पक्ष पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केलं.  कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून दीपक पाटील हे २० ऑगस्ट २०२१ पासून कार्यरत होते. त्यांची पदोन्नतीनं जळगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी बदली झाली. दीपक पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर गडचिरोलीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना पदोन्नती मिळाली. आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्याचबरोबर विविध संस्था, संघटना, पक्ष पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केलं. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरच्या कामासाठी प्राधान्य देऊ असं आश्वासन दिलं. 

                               विजय चव्हाण हे मूळचे बुलढाणा येथील असून त्यांनी आपलं बीई मेकॅनिकलचे शिक्षण पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये  पूर्ण केलंय. सन २००० पासून ते परिवहन विभागात  कार्यरत आहेत. आतापर्यंत परभणी, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं त्यांनी सेवा बजावलीय. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले, शंभूराजे पवार, विशाल बागडे, किरण खोत, युनूस सय्यद यांच्यासह कार्यालयाचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.