कोल्हापुरात ज्वेलरी एक्सपोर्ट विषयावर सेमिनाराचं आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी : ज्वेलरी एक्सपोर्ट कसे करावी याची माहिती करुन घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. मात्र सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य व आरआरबी फाउंडेशनच्या वतीने अतिशय कमीत कमी दरात नोंदणी फी मधे ज्वेलरी एक्सपोर्ट कसे करावे या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले. यासोबतच सर्व सरकारी कार्यालयांची माहिती व संपुर्ण प्रोसेस संबंधित माहिती या सेमिनारमध्ये मिळणार आहे.
या सेमिनारचं आयोजन रविवारी 22 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौंसील, नॅशनल स्कील कौन्सिल यांच्या समन्वयातून सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया ज्वेलर्स ऍंड गोल्डस्मिथ फेडरेशन(AIJGF) व आरआरबी फाउंडेशन यांच्या तर्फे ज्वेलरी क्षेत्रात कोल्हापुरातुन सुवर्णकार व सोने चांदी दागिने मॅन्युफॅक्चर, होलसेल यांना ज्वेलरी एक्सपोर्टर सोन्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहेत.
अधिक माहितीसाठी नचिकेत भुर्के मोबाईल नंबर 9595626362 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोनार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.