राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील राजर्षि शाहू गव्हर्मेंट सव्र्व्हटस् को ऑप बँकेमार्फत सभासदांच्या मुलींसाठी "पद्माराजे पारितोषिक" रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम तसेच "सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार" समारंभ रविवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे. सभासदांच्या मुलींनी व मुलांनी या पारितोषिकांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष रोहित प्रकाश बांदिवडेकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
खालील प्रमाणे पात्रता राहील -
मुलींकरीता -
ज्या सभासदांच्या मुली सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात सरासरीप्रमाणे श्रेणी व नुसार 61% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून इयत्ता 4 थी ते 8 वी उत्तीर्ण झाल्या आहेत तसेच ज्या मुलींनी इयत्ता 9वी, 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 80% गुण मिळवले असतील त्यांनाच पद्याराजे पारितोषिक निधीतून वक्षिसे दिली जातील.
विशेष प्राविण्य -
बँकेच्या सभासदांच्या मुले / मुली यांनी सन 2024-2025 या सालामध्ये केंद्रिय स्तरावर व राज्य स्तरावर कला, क्रिडा, साहित्य व इतर विषयात प्रथम किंवा व्दितीय क्रमांकाने गौरविलेल्या आहेत अशी मुले व मुली अथवा सभासद सुध्दा या निधीतून बक्षिस मिळण्यास पात्र राहतील.
मुलांकरिता -
ज्या सभासदांच्या मुलांनी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी व इ. 12 वी परिक्षेत जास्तीत जास्त गुण प्राप्त केले असतील त्या पैकी गुणांनुक्रमे पहिले फक्त पाच विद्यार्थी कै. छबुसिंग चव्हाण पुरस्कार मिळण्यास पात्र ठरतील.
तरी सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनी व पात्र मुला मुलींकरीता सभासदांनी त्वरित या बाबतचे अर्ज गुणपत्रिकेच्या साक्षांकित सत्य प्रतिसह बँकेच्या प्रधान कार्यालय अथवा नजिकच्या शाखांमध्ये बुधवार 13 ऑगस्ट अखेर सादर करावेत. अर्ज सादर करीत असतांना त्या मध्ये सभासदांचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन क्रमांक, सभासद क्रमांक आणि ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक पाल्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा असे आवाहनही बँकेमार्फत करण्यात आले आहे.