कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७२८ पदभरती प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७२८ पदभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी दिली.
आय.बी.पी.एस. (IBPS) कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षेद्वारे ही पदभरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीबाबत उमेदवारांच्या काही शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी जिल्हा परिषदेत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी गरज भासल्यास ०२३१-२६५ ५४ १६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.