गगनबावडा नदीकाठच्या लोकांनां सतर्कतेचा इशारा: पर्यटकांना येणेस बंदी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरासह जिल्हयात पावसाने उसंत मारली आहे, तर राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही दिवसात पंचगंगा नदी पाणीपातळी हि पात्राबाहेर अली होती. मात्र, पावसाने उसंत मारली असून पंचगंगा नदीमध्ये असणारी मंदिरे आता दिसत आहेत. आज देखील शहरात पावसाने उसंत मारली आले.मात्र, आज दुपारी 1.00 वाजता अणदूर ल.पा. तलाव तालुका- गगनबावडा हा 100% भरला आहे. तर कुंभी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांनां सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने पर्यटकांना येणेस बंदी घालण्यात अली आहे. तसेच शहरात काही दिवसात पावसाने जोर घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.