घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमीची जेईई मेन्स फेज-१ मध्ये भरारी

अतिग्रे : ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखणा-या संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी ने जेईई मेन्स फेज-१ मध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे.
संस्थेच्या सचिन सेठ हेत या विद्यार्थ्याने या परीक्षेमध्ये (९९.९५) पर्सनटाईल गुण प्राप्त करुन संस्थ्येच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे . तसेच संस्थेच्या आदित्य जाधव (९९.८७) पर्सनटाईल, सार्थक खोत (९९. ८७) पर्सनटाईल, आर्यन पुजारी (९९. ८६) पर्सनटाईल, रसेल मंतेरो (९९.८६) पर्सनटाईल. या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त करून संस्थेच्या यशामध्ये अधिक भर टाकली आहे .
अकॅडमीच्या २६ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सनटाईल च्या वरती गुण प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे डायरेक्टर श्री वासू सर यांनी अभिनंदन केले . या प्रसंगी बोलताना ‘’ संस्थेची यशस्वी वाटचाल अशीच सुरु राहील व असे अनेक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असणा-या संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी मधून तयार होतील “ अशी आशा व्यक्त केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे चेअरमन संजयजी घोडावत व विश्वस्त विनायकजी भोसले यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.