HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

घोडावत विद्यापीठातील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठातील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

हातकणंगले (प्रतिनिधी) : संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले आहे. येथील फार्मास्युटिकल सायन्सेस मधील बी.फार्म ची विद्यार्थिनी किमया शिंदे आणि अरिहंत परमाज यांची एडिग्लोब प्रा. लि. बेंगळुरू या प्रमुख व्यवसाय विकास व्यवस्थापन संस्थेत व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली.त्यांना साडेपाच लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले.

दरवर्षी विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या  विद्यार्थ्यांची निवड झाली. यासाठी विद्यापीठाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. एन. व्ही. पुजारी, समन्वयक प्रा. सूरज कुमार पाटील, डेप्युटी टीपीओ अधिकारी मिलिंद पाटील आणि प्रा. सौरभ भोसले यांचे सहकार्य लाभले.  या यशाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थी व फार्मसी चे संचालक डॉ.सुभाष बी.व डी.फार्मसी चे विभाग प्रमुख डॉ.जीवन लव्हांडे, प्रा.विद्याराणी खोत यांचे अभिनंदन केले.

"येथे मला मिळालेले उच्च दर्जाचे शिक्षण आणि माझ्या कडून करून घेतलेल्या तयारीबद्दल मी फार्मसी विभागाची ऋणी आहे. विद्यापीठामध्ये जागतिक दर्जाच्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधेचा मला फायदा  झाला.” अभिप्राय-किमया शिंदे. 

 "घोडावत विद्यापीठांमधील फार्मसी विभागात शिक्षण घेतल्याने मला ही संधी प्राप्त झाली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रीकरिता आवश्यक असणाऱ्या सॉफ्ट-स्किल च्या विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा मला फायदा झाला आहे.” अभिप्राय-अरिहंत परमाज .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.