वारणा धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा

वारणा धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन आज रोजी पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्याकरिता धरणातून येत्या चौवीस तासात वक्र द्वाराद्वारे केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे .त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.