HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जालना : दहा वर्षांच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडुन अत्याचार

जालना : दहा वर्षांच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडुन अत्याचार

जालना : जालना जिल्ह्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे.  चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक प्रल्हाद किसन सोनूने याने जीवे मारण्याची धमकी देऊन तीन आणि चार फेब्रुवारी रोजी अत्याचार केले.

ही घटना  पीडितेच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी सरपंचांच्या कानावर ही बाब घातली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सरपंच कल्याण देशमुख आणि गावकरी शाळेत गेले. मुख्याध्यापक सोनुने याला घडलेल्या घटनेचा जाब विचारला असता, त्याने सर्वांसमक्ष त्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सोनुनेला चोप दिला.

संबंधित शाळेत दोन शिक्षक आहेत; मात्र दोघे कधीच एकत्रित उपस्थित नसतात. नेहा परडे या महिला शिक्षक आहेत. त्या अधूनमधून शाळेत येतात. सोनुने हा जालन्यातील चौधरीनगर भागात राहतो. तो २००९मध्ये निमखेडा तांडा जिल्हा परिषद शाळेत असताना अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याला त्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनेक दिवस तो कोठडीत होता. त्यानंतर निलंबित झाला व परत नोकरीत रूजू झाला. मौजपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे अधिक तपास करीत आहेत.

  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.