जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू पुरस्काराचे बुधवारी वितरण

जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू पुरस्काराचे बुधवारी वितरण

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदे वतीने राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार, यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा उद्या दि.26 जून रोजी महासैनिक दरबार हॉल मध्ये वितरण करण्यात येणार आहे.  

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. 

या कार्यक्रमाकरीता सर्व मान्यवर व अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त सर्व कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहावे, असे आवाहन जि.प. सीईओ कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.