जि. प.पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंतापदी अर्जुन गोळे

जि. प.पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंतापदी अर्जुन गोळे

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी अर्जुन गोळे यांनी आज पदाभार स्वीकारला. या पदावर वैजनाथ कराड हे प्रभारी म्हणून काम पाहत होते.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद रिक्त होते. हा विभाग प्रभारी अधिकारी यांच्याकडूनच चालवला जात होता. आज गोळे यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या विभागाला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. गोळे यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता म्हणून, डिसेंबर २०२१ मध्ये पनवेल येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थान उपविभागाचे उप अभियंता म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर पदोन्नतीवर ते मे २०२३ मध्ये ठाणे, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय येथे आणि आता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले आहेत.