अमटेक समूहाविरुद्ध ईडीची मोठी कारवाई: दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रातील 35 ठिकाणी टाकले छापे

अमटेक समूहाविरुद्ध ईडीची मोठी कारवाई: दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रातील 35 ठिकाणी टाकले छापे

नवी दिल्ली: अमटेक समूहाविरुद्ध ईडीने दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रातील 35 ठिकाणी छापे टाकले. हे छापे बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित होते ज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 

ईडीच्या तपासात समोर आले की अमटेक समूहाने विविध बँकांमधून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते आणि त्यांचा गैरवापर केला.कर्जांचे योग्यरित्या वापर न करता, त्यांना वेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले आणि खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली.

छापे टाकण्याचे ठिकाण:

दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रातील 35 ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यात कंपन्यांची कार्यालये, संचालकांचे निवासस्थान आणि इतर संबंधित ठिकाणांचा समावेश होता. ईडीने छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, रोकड, आणि इतर महत्वाच्या पुराव्यांची जप्ती केली.यात 39.33 किलो सोनं आणि हिऱ्यांचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे 24.7 कोटी रुपये होती, आणि 1.11 कोटी रुपये रोख पैसे जप्त करण्यात आले.

अमटेक समूहाच्या प्रवर्तकांनी बँकांना खोटी माहिती देऊन कर्ज घेतले आणि त्या कर्जाचा वापर खोटे व्यवहार दाखवून केला.कंपन्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये खोट्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंद करण्यात आली होती, ज्यामुळे बँकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.

फसवणूक केलेल्या बँकांची नावे:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI),बँक ऑफ इंडिया आणि (BoI)कॅनरा बँक. 

ईडीने या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पुरावे जमा केले असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींना पुढील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.